पेठमध्ये यात्रेनिमित्त तीळगंगा नदीची स्वच्छता…..

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वाळवा तालुक्यातील पेठ येथील श्री माणकेश्वर, श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त माजी वसुंधरा अभियानांतर्गत दोन्ही मंदिरालगत असणाऱ्या तीळगंगा नदीचे पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम युद्धपातळी सुरू आहे. तसेच पाण्याची व्यवस्था लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे काम यात्रा कमिटीचे अध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष महेश माळी, सरपंच डॉ. सुभाष भांबुरे, उपसरपंच रविकिरण बेडके यांच्या निरीक्षणाखाली होत आहे.