इस्लामपूर येथील तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांना वेळेत दाखले मिळावेत. सर्व्हर सतत बंद पडत आहे, त्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकांची कामे वेळेत व्हावीत, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) च्यावतीने दिले.
कार्याध्यक्ष स्वप्नील टिबणे, तालुका अध्यक्ष जमीर मगदूम, संजय पाटील, जयसिंग जाधव, मंगल शिंदे, उषा जाधव, चित्रा सूर्यागंध उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, वाळवा तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनीची आणि त्यांच्या पालकांची शैक्षणिक दाखल्यांसंदर्भात तसेच लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी राष्ट्रवादी यावेळी सरचिटणीस दादासाहेब कार्यकर्त्यांकडे तक्रारी आल्या आहेत.