विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांमध्ये आपल्या उमेदवारीसाठी दावेप्रति दावे सुरु आहेत. त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सुहासभैय्या बाबर भाजपचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते वैभव दादा पाटील यांच्या तिकिटासाठी हेवेदावे सुरू आहेत.
अशातच आता विट्यात मा. अमोलदादा आणि मा. सुहासभैय्या बाबर यांनी राबवलेला उपक्रम खूपच चर्चेत आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक मा. अमोलदादा आणि मा. सुहासभैय्या बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुजय गोसावी व श्रीधर जाधव यांनी डबरी वस्ती येथील 50 महिलांचे सुमारे दोन कोटी 64 लाख रुपये इतक्या रकमेचा विमा उतरवला. त्याचा वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
प्रत्येक महिलेचा एक्सीडेंटली दोन लाख आणि नॅचरल डेट दोन लाख असे एकूण चार लाख रकमेचा विमा उतरवला आहे. यावेळी सुहासभैय्यांसह अमोल दादांची तोफ धडाडली. विट्यातील हा उपक्रम मोठ्या चर्चेत आला आहे. यावेळी माजी नगरसेवक अनिल आप्पा बाबर, किशोर काका डोंबे, शिवाजीराव हरगुडे ॲड.विनोद गोसावी, पापा मुल्ला यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.