खानापूर मतदारसंघात…..

खानापूर मतदारसंघात सध्या विचित्र राजकीय परिस्थिती पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील सुहासभैय्या बाबर, वैभवदादा पाटील, पडळकर, देशमुख हे चारही प्रमुख गट महायुतीच्या घटक पक्षात आहेत. सुहासभैय्या बाबर यांनी वैभवदादा आणि पडळकर बंधूंना तगड आव्हान दिलेले आहे. महायुतीकडून माझी उमेदवारी फायनल असल्याने विरोधकांना अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढावे लागेल असा दावा विकास कामासंदर्भातील पत्रकार परिषदेत सुहास भैय्यांनी केलेला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांमध्ये आपल्या उमेदवारीसाठी दावेप्रति दावे सुरु आहेत.

त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सुहासभैय्या बाबर, भाजपचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते वैभव दादा पाटील यांच्या तिकिटासाठी हेवेदावे सुरू आहेत.त्यामुळे सुहासभैय्या बाबर यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यास अन्य इच्छुक उमेदवारास महाविकास आघाडीतून लढावे लागणार आहे. मात्र महायुतीची उमेदवारी निश्चित असलेले सुहासभैय्या बाबर महाविकास आघाडीकडून देखील मला ऑफर असल्याचे सांगत असल्याने आता विरोधकांनी जायचे कुठे अशी चर्चा सध्या खानापूर मतदारसंघात रंगू लागली आहे.