महाविकास आघाडी कडून सुहासभैया बाबर यांना ऑफर मात्र……

गेल्या आठवड्यात आटपाडीत एका कार्यक्रमात सुहास बाबर यांना लाखाच्या मताने निवडून आणू असा दावा खा. पाटील यांनी केला होता. खानापूर आटपाडीचे आ. अनिल बाबर यांच्या निधनानंतर वारसदारसुहास बाबर हे महायुतीतील शिवसेना शिंदे गटातून प्रबळ दावेदार आहेत. ती जागा शिंदे सेनेकडेच आहे. असे असताना विशाल पाटील यांनी बाबरयांना बळ देणार असे वक्तव्य केल्याने उलट सुलट चर्चेला उत आला.

मी महाविकास आघाडीचाच आहे. महायुतीशी देणे घेणे नाही, उलट वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून खानापूर, आटपाडीतून सुहास बाबरना महाविकास आघाडीची ऑफर दिली आहे. त्यांना निवडून आणून लोकसभेचा पैरा फेडू असे खा. विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. मात्र ठाकरे गटाचे नेते चुकीचा अर्थ काढून दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर धनगर समाजाची दिशाभूल करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला ऑफर दिली असली तरी यापुढेही शिवसेनेत राहून यापुढेही काम करणार आहे, असे सुहास बाबर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करीत असून मी महायुती सोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचा निधनानंतर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी मला आधार दिला आहे.

मतदारसंघासाठी भरघोस निधी देऊन पक्षाच्या नेत्यांनी आमच्यावरील विश्वास कायम दाखवला आहे. त्यामुळे मी महायुतीतच राहणार आहे. विशाल पाटील हे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारीस अडचण केल्याने विधानसभेला उट्टे काढण्यासाठी बाबर यांना खुलेआम मदत करीत महाविकास आघाडीशी प्रतारणा करणार असे आडाखे बांधले जावू लागले आहेत. यामुळे त्यांनी खुलासा केला.ते म्हणाले, खानापूर आटपाडीत महायुतीचे सुहास बाबर सोडून अन्य चार नेते आहेत. महाविकास आघाडीतील नेते त्यातील काहीना उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुहास बाबर यांची कोंडी होऊ शकते. शिवाय महाविकास आघाडी त्यांची वाट मोकळी आहे त्यामुळे माझा आग्रह आहे ही सुहास बाबर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी द्यायची.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची असो किंवा काँग्रेसची सुहास बाबर यांचा पैरा फेडण्यासाठी महाविकास आघाडीत यावे. निवडून आणण्यासाठी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे बळ मिळेल असा आग्रह पाटील यांनी केलेला आहे. त्यासाठी वरिष्ठानकडून काही सोडवून देखील केली आहे असे पाटील म्हणाले.