खानापुरात जनतेचा कौल सुहासभैयांनाच; वैभव पाटील यांना विटातून मताधिक्य

खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या तिरंगी आणि काटा लढत झाली. खानापूर मतदारसंघातील मतदार यावेळी कोणाला फळ देतात याकडेच सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र महायुतीचे उमेदवार सुभाष बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्यातच झालेल्या लक्षवेधी दुरंगी लढतील खानापूर मतदार संघातील जनतेने मात्र कौल सुभाष बाबर यांच्या बाजूने दिल्याने निकालातून स्पष्ट झाले.

सांगली जिल्ह्यातील हा एकमेव खानापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला असून सन 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा आमदार अनिल भाऊ बाबर चांगल्या मताने निवडून आले होते. त्यांच्या पक्षात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत सुहास बाबर हे तब्बल 78 हजार 117 मतांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून बाबर कुटुंब्याच्या आमदारकीची हॅट्रिक करून खानापूर विधानसभा मतदारसंघात एक नवा इतिहास घडविला.