गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील मुस्लिम समाजातर्फे गाव बंद ठेवून निषेध केला. गावातील सर्व धर्मातील लोकांनी प्रतिसाद दिला.व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. गावामध्ये पोलिस बंदोबस्त होता. हातकणंगले नायब तहसीलदार चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक सायकर, मंडल अधिकारी एन. एन. बेळणेकर, तलाठी एस. व्ही. चांदणे, पोलिस पाटील नयन पाटील यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, याचे निवेदन दिले. माजी सभापती राजेश पाटील, जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, मंगेश काशीद, चंद्रप्रभा सोसायटीचे अध्यक्ष बालेचाँद जमादार आदी उपस्थित होते.
Related Posts
हातकणंगले, कोल्हापूरचा पेच कायम! यादी रखडली
शनिवार (दि. 16) पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असली, तरी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील महायुती व महाविकास आघाडीच्या…
हातकणंगलेत सरकारी कार्यालयांत शुकशुकाट! पंचायत समितीमध्ये ठीय्यासह घोषणाबाजी
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबरच विविध मागण्यासंदर्भात हातकणंगले येथील सर्व सरकारी कार्यालयात काम बंद करण्यात आले. तहसील कार्यालय उघडले होते.…
चिमुकली झोपेत घोरत होती, सावत्र आईचा संताप! लोखंडी रॉड तापवला अन्…….
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आईने पाच वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करून जखमी केले. मारहाणीदरम्यान पीडित मुलीच्या…