राजू शेट्टी शेतकरी हिताला प्राधान्य देणार…

यंदा मी खासदार झालो की गेल्या टर्मला माझं एक काम अपूर्ण राहिल होते. ते म्हणजे मागच्या वेळी एम एस पी गँरटी कायद्याचे विधेयक मांडले होते. मात्र, त्यावर दुर्दैवाने चर्चा होऊ शकली नाही. यामुळे सध्या संपूर्ण भारतातील शेतकरी हा कायदा मंजूर व्हावा यासाठी मागणी करत आहेत आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत.

मात्र आता मी खासदार झालो की पहिल्यांदा हा विधेयक पुन्हा मांडून त्याचा कायदाच रूपांतर करायच आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान हमीभाव कायद्याचे संरक्षण द्यायचे हे माझं उद्दिष्ट आहे. या सोबतच मतदारसंघातील आणि विद्यार्थी, महिला, सुळकुड पाणी योजना यासारखे यांचे अनेक प्रश्न आहेत जे मला संसदेत मांडायचे आहे आणि ठाम भूमिका घ्यायला सरकारला भाग पाडायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.