खानापूर मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार……

सध्या खानापूर मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुक उमेदवारीसाठी चुरस पहायला आपणाला मिळत आहे. महायुती व विरोधी महाविकास आघाडी एक संघ लढेल या दोन्ही पक्षांचा एक एकच उमेदवार मैदानात येणार आहे. राजकीय पक्षात विधानसभेची उमेदवारी ही विनिंग मेरिटवर ठरत असते. त्यासाठी जो सर्व्हे केला जातो. तो सर्व्हे सहाच्या सहा पक्षांकडे तयार आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाची बैठक ही नुकतीच झाली आणि त्या बैठकीत पहिल्या दहा उमेदवारात सुहासभैय्या बाबर यांचे नाव निश्चित असून ए प्लस मध्ये त्यांची उमेदवारी गृहीत धरली आहे.

विनिंग मेरीटचा उमेदवार असल्याने महाविकास आघाडी सुद्धा माझा विचार करू शकते अशी सुहासभैय्या बाबर यांनी गुगली देखील टाकली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकात सुहास भैय्यांनी माझे नाव आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आपणच असणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अशातच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, भाजपचे ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील विधानसभा लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार आणि खानापूर मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या उमेदवारीचे चित्र कसे असणार हे येणाऱ्या काळातच कळेल.