सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागविण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले जात आहेत.
सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. सध्या पलूस कडेगाव व जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सांगली देखील काँग्रेसचा मतदार संघ आहे. या ठिकाणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत.
खानापूर आटपाडी मतदारसंघातून डॉ. जितेश कदम इच्छुक आहेत. याचबरोबर मिरज मतदारसंघावर देखील काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने आता इच्छुकांची अर्ज मागवले आहेत. दिनांक 8 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.