स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी विटा येथे तालुका वनपरिक्षेत्र कार्यालय मंजूर करून आणले होते त्याचा भूमिपूजन सोहळा स्वर्गीय भाऊंच्या हस्ते मोठ्या दिमाखात साजरा केला होता. त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.
या इमारतीचा उद्घाटन सोहळा खानापूर आटपाडीचे युवा नेते सुहास भैया बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला. तालुका वनपरिक्षेत्र कार्यालयाची इमारत सर्व सोयींनी युक्त आहे. स्वर्गीय भाऊंनी या इमारतीचा कामासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. आज ही इमारत उभे असताना भाऊंच्या कामाची साक्ष देत आहे. इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी वनसंरक्षण अधिकारी, वनअधिकारी, प्राणिमित्र, विविध गावांचे सरपंच सामाजिक कार्यकर्ते व वैनाविभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.