रुकडीत आष्टापद तीर्थ येथे होणाऱ्या पंचकल्याणक पूजेचा मुहूर्तमेढ विधी उत्साहात संपन्न

रुकडी येथील आष्टापद तीर्थ येथे होणाऱ्या पंचकल्याणक पूजेचा मुहूर्तमेढ विधी उत्साहात झाला. पूजेच्या मुख्य मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ प्रथम गणिनी प्रमुख आर्यिका मुक्ती लक्ष्मी माताजी व आर्यिका निर्वाण लक्ष्मी माताजी यांच्या पावन सान्‍निध्यात व कमल आण्णासाहेब शेंडुरे व सुजाता सुभाष पाटील यांच्या हस्ते झाला.