तारदाळ येथील गायी चोरणाऱ्या दोघांना अटक…

इचलकरंजी तारदाळ येथील दोन जर्सी गायी चोरणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव अनिल पुजारी (वय २८ रा. चंदूर) आणि राजाराम आकाराम कांबळे (वय ३१ रा. कोंडगे) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.येथील संदीप पाटील यांचा तारदाळ गावात जनावरांचा गोठा आहे. गोठ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन जर्सी गायची चोरी केली होती. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार वैभव पुजारी आणि राजाराम कांबळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.