इचलकरंजी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा……

कबनूर गाव देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची कर्मभूमी आहे व त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या गावात मोठ्या प्रमाणात आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पक्षाला उत्साहाचे वातावरण निर्माण करेल. इचलकरंजी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदार संघावर काँग्रेसचा दावा राहिल, असे प्रतिपादन इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले.
इचलकरंजी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या काँग्रेस प्रति असणाऱ्या योगदानाची आठवण करून दिली. विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा आहे. व तो आपल्याकडेच रहावा अशी मागणी केली.
कबनूर काँग्रेसचे अध्यक्ष अरुण गिते म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये राहुल खंजिरे, संजय कांबळे, शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. गेली ४० वर्षापेक्षा जास्त काळ मतदार संघ काँग्रेसकडे आहे.

त्यामुळे हा मतदासंघ काँग्रेसकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावा व महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार देण्यासाठी सतेज पाटील यांनी समन्वय घडवून लवकरात लवकर उमेदवारीचा विषय निकाली काढावा, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये जास्त काळ संभ्रम राहणार नाही.यावेळी कबनूर काँग्रेसचे उपाध्यक्ष रियाज चिकोडे, अल्ताफ मुजावर, प्रमोद खुड़े, युवराज शिंगाडे, शेखर पाटील मुन्ना खलिफा, बिस्मिल्ला गैबान, महिला अध्यक्षा राणी बोराडे, शबाना नदाफ, युवराज कांबळे, शिवाजी चव्हा, राजू मुल्ला, कुणाल भोसले, राजू बबन्नावर, विशाल पवार, मुजमिल मुजावर यांच्यासह कबनूर मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.