कुरुंदवाड पुरग्रस्तांच्यासाठी निवारा केंद्रे आणि जनावरांच्या स्थलांतरासाठी तेरवाड येथील पार्वती सूतगिरणीच्या मैदानावर सोय करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन, स्थलांतर पथके पाणी आलेल्या ठिकाणी कार्यरत आहेत.नागरिक आणि प्रशासनाच्या समन्वयातुन संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी उद्या शनिवारी ४ वाजता पालिका सभागृहात बैठक आयोजित केली आहे. नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी केले आहे.आशिष चौहान म्हणाले महापूर परिस्थिती निर्माण झाल्यास पूर बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी शहरातील शाळा व कॉलेज स्थापित करण्यात आले आहेत.आपत्ती ही आकस्मित घडत असते.
अशा आकस्मित घटनेला न घाबरता नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कमिटीशी संपर्क साधून संबंधित परिस्थितीची माहिती द्यावी त्यामुळे प्रशासनाला आपत्तीचा सामना करणे सोपे जाईल.पालिकेने यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट सह आदी सामग्री तयार ठेवल्या आहेत. पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
हे कक्ष 24 तास कार्यरत आहे. आकस्मिक घटना घडत असल्यास त्वरित कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी चौहान यांनी केले आहे. आम.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पार्वती सूतगिरणी येथे जनावरांच्या स्थलांतरासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी चारा छवनी सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.