इचलकरंजीतील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल….

सध्या पावसाचा जोर सगळीकडेच आहे. काल आज पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे सर्वत्र शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. इचलकरंजी शहरांमध्ये अनेक नागरिकांचे स्थलांतर देखील पूर परिस्थितीमुळे करण्यात आलेले आहे. आज शनिवारी म्हणजे 27 जुलैला सकाळी सात वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी ही 70.03 फूट इतकी होती. तर इशारा पातळी 68 फूट व धोका पातळी ७१ फूटवर आहे त्यामुळे पाणी पातळी आता धोका पातळी जवळ गेलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.