मी कुठल्या गटा-तटाचे राजकरण न करता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा सामान्य कार्यकर्ता हा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक झाला पाहिजे. यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. जिल्हाध्यक्ष म्हणून शिराळा पासून ते जत पर्यंत कधी ही हाक मारा, तुमच्यासाठी कायम उभा असेन, अशी ग्वाही, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली.
सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा झाला. दरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यशाळा झाली. महाडिक पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीतर्फे जे जे कार्यक्रम देतील. ते तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि येत्या काळात सांगलीवर भाजपचा झेंडा दिसेल.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आ.गोपीचंद मंत्री मकरंद देशपांडे, आ.गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य नीर्ता केळकर, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आम. भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, सरचिटणीस विलास काळबाग, मिलिंद कोरे, प्रसाद पाटील, हणमंत पाटील, विद्याताई पाटील, पै. जयकर कदम, अनिता धस, अझम मकानदार, सुरेंद्र चौगुले, डॉ. सचिन पाटील, अमोल पडळकर, अर्जुन साळुंखे, संदीपराज पवारयांच्यासह सर्व मंडलाचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.