इचलकरंजीत फिरते शौचालयास आग!

इचलकरंजीतील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या खुल्या भूखंडावर महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दोन फायबर शौचालये ठेवली आहेत. शौचालयानजीक पडलेल्या कचऱ्याचा ढिग कोणीतरी पेटवल्याने उन्हाचा तडाखा आणि कचरा व प्लॅस्टिकमुळे ही आग लगतच्या दोन्ही शौचालयांना आग लागली. या आगीत शौचालयाचे संपूर्ण फायबर जळून खाक झाल्याने सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. आग विझविल्यानंतर शौचालयाचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले होते.शौचालये ही फायबरची असल्याने दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. मात्र आगीत शौचालये जळून खाक झाल्याने केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला होता. दरम्यान, कचरा वेचक महिलांनी कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे शौचालयांना आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू होती.