सध्या प्रत्येक भागात गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली आहेच अशातच आता अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत आहे. त्यांचे आयुष्य बिघडत चालले आहे. इचलकरंजी जवळील तारदाळ येथे प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमध्ये एका यंत्रमाग कारखान्यालगत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास उघड्यावर गोलाकार बसून चिलीममधून गांजा ओढणाऱ्या आठ युवकांवर शहापुर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहापूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, तारदाळ येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमध्ये एका यंत्रमाग कारखान्यालगत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास उघड्यावर गांजा ओढत बसणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये लक्ष्मण परशुराम बागडी (वय २२, रविंद्र परशुराम माळी (वय २७, रा. कोरोची), अनुकुल माधव इनामदार (वय २५, रा. तारदाळ), रामेश्वर दत्ता लिंगायत (वय २९, रा. शहापुर), सागर राजू वंजीरे (वय १९, रा. इचलकरंजी), अमर प्रमोद फातले (वय २०, रा. तारदाळ), रोशन मुरली साहु (वय २२ रा. तारदाळ), स्वप्नील महावीर हलगुरे (वय २१, रा. कोरोची) आदि आठजणांचा समावेश आहे.