कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती (Kolhapur Flood) आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या.बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर आलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Related Posts
चांदोली धरणाचे दोन वक्र दरवाजे…..
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला वरदान ठरलेले चांदोली (वारणा) धरणात २८.१५ टीएमसी (८२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात…
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती……
कोल्हापूर जिल्ह्यात सतत ३ दिवस चालू असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने ३९ फूट ही ‘इशारा पातळी’ ओलांडली असून तिची ४४ फूट…
पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी! कोल्हापूरकरांची वाढली धाकधूक
कोल्हापूर जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची…