कबुतरखान्यांचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. कबुतरखाना बंदी समर्थनार्थ दादरमध्ये मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात आलं. मराठी एकीकरण समितीची आंदोलनावर जैन मुनींनी (Jain sages) प्रतिक्रिया दिली आहे. हिंसेच्या भाषेवरून जैन मुनींचा यू टर्न घेतला असून या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मराठी एकीकरण समितीचा हा वाद सोडवण्यासाठी राज ठाकरेंकडे जाणार. राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत. साहेब हा मराठी विवाद सोडवा अशी विनंती त्यांना करणार आहे. मराठी-मारवाडीचा वाद वेगळा आहे. उत्तर प्रदेश- बिहार त्यांच्याशी मला काही देणं-घेणं नाही. आम्ही मराठी भाषेचा सन्मान करतो. महाराष्ट्रात राहतो. राजस्थान आमची जन्मभूमी आहे तर महाराष्ट्र कर्मभूमी आहे. या महाराष्ट्राने आम्हाला सन्मान दिलाय, लक्ष्मी दिली सर्वकाही महाराष्ट्राने दिलं आहे. त्या मराठी लोकांचा अपमान आम्ही कधी करणार नाही. जो अपमान मराठी भाषेचा केला जातो तो आम्ही सहन करणार नाही. जो मराठी भाषेचा अपमान करत असेल त्याला तुम्ही प्रसाद द्या.’
‘जैन समाजाने आजपर्यंत कधी शस्त्र हातात उचलले नाही आणि उचलणार ही नाही. महापालिकेने 52 कबुतरखान्यावर बंदी आणली आमच्या घरावर नाही. कबुतर भुकेने जीव जाऊ नये म्हणून कारण हा प्राणी आमच्या धर्माशी कनेक्ट आहेत. आमचे काही वकील सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला उच्च न्यायालयात जायला सांगितले. मात्र आम्हाला तिथे न्याय मिळाला नाही तर आम्ही अमरण उपोषण करु. आम्ही हे युद्ध पुकारले आहे. तलवारीचे युद्ध नाही अहिंसाचे युद्ध आहे. आम्ही ब्रह्मशस्त्र वापरु. कोणतं शस्त्र वापरु तर उपोषण. आम्ही संपूर्ण भारतात जेव्हढे जैन लोक आहेत ते उपोषणाला बसणार ते जीवदयासाठी,’ असं त्यांनी म्हटलं आहे. माझे शस्त्र हे उपोषणाचे आहे, तलवार माझे शस्त्र नाही, मी कोणावर शस्त्र उचलणार माझ्या मराठी बांधवांवर ? तर नाही शस्त्र म्हणजे उपोषणाचे शस्त्र बाकी कोणते शस्त्र नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
