अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयात संस्कृत दिन साजरा

आष्टा, येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय येथे संहिता सिद्धांत व संस्कृत(Sanskrit) विभागातर्फे संस्कृत दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त चरक संहिता पूजन, रांगोळी स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, संहिता वाचन व व्याख्याने तसेच विजेत्यांना बक्षीस वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये संस्कृत (Sanskrit)नाट्य, नृत्य, संस्कृत स्तोत्र, वाद- विवाद, सरल संभाषण आदींचा समावेश होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग देशमुखे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. संस्कृत  क्लबचे सचिव प्रा. सौगंध थोरात यांनी ‘संस्कृतच्या -हासाची कारणे व उपाय’ याकडे सर्वांचे लक्ष वेधले. शैक्षणिक उपप्राचार्य डॉ. जयवंत खरात यांनी संस्कृत संबंधी संस्कृत क्लबकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. पराग देशमुखे यांनी संस्कृत स्वीकृत करून संस्कृती कशी टिकवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी व उपप्राचार्य डॉ. विजय डांगे, डॉ सुभाष पत्की, | संहिता विभाग प्रमुख डॉ. प्रशांत शिर्के, डॉ. सुभाष पत्की, डॉ. सर्फराज लांडगे, डॉ. किरण कोळी, डॉ. श्रद्धा कोळी, डॉ. सोनिया कोळी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. अर्चना वाडकर, डॉ. रुपाली पाटील उपस्थित होते.