गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे. 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु आहेत. 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा,साखर,चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.…
लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुतीत खळबळ उडालेली आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.…