नेमिनाथनगर येथे एस. टी. बस थांबण्याच्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून एक मोठा खड्डा दिसत आहे. त्या खड्डयात पाणी साचले आहे. डांबरी रस्त्यालगतच असणारा हा खड्डा वाहतुकीस धोकादायक आहे याकडे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आष्टा ते इस्लामपूर रस्ता विस्तारीकरण काम वेगाने सुरु असल्याने व आष्टा ते वाळवा रस्ता नव्याने वाहतूक सुलभ तयार झाल्याने सांगली इस्लामपूर वाहतूक गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून वाळवा मार्गे सुरु आहे. तशातच तासगांवकडून वाळव्यातून जाणारा रस्ता ८० फुटी कॉक्रिट व दुभाजकासह करण्याचे काम सुरू असल्यामुळे वाळव्याचा बायपास रस्ता सतत वाहतुकीने गजबजलेला असतो.
अनेक वर्षापासून एस टी स्टैंडनाही पूर्वीपासूनचा वाळव्याचा पेठ भागातून येणारा मुख्य रस्ता वाढत्या लोकसंख्येने अपुरा पडतोय तशातच एसटी वळवायला जागा नाही यास्तव तासगाव रस्त्यावरील नेमिनाथनगर येथील कॉर्नर एसटी स्टैंड म्हणूनच ओळखला जातो. याच ठिकाणी रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम सुरू असून दुतर्फा कॉक्रिट गटारीचे काम पूर्ण होत आले आहे. रस्त्यावर भर टाकून मजबूत रस्ता आकाराला येणार आहे. सध्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत.
