पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी अर्धा फुटाने घट….

पंचगंगेची पातळी कमी होत असली, तरी पाणी अजून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रात्री नऊच्या सुमारास ४७.१ फूट इतकी पातळी होती. दिवसभरात ती सहा इंचाहून अधिक कमी होऊन स्थिर राहिली. त्यामुळे महापुराची स्थिती कायम आहे. सकाळी व सायंकाळी काही काळ सूर्यदर्शन होऊन कडकडीत ऊनही पडले. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. शहरात काही भागांतील पाणी कमी झाल्याने बंद केलेले रस्ते सुरू करण्याची धावपळ प्रशासनाकडून सुरू होती.पाणी ओसरलेल्या भागात महापालिकेने तातडीने औषध फवारणी करून घेतली. अद्याप जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण असे एकूण १०४ मार्ग बंद आहेत. तसेच रात्री ८६ बंधारे पाण्याखाली होते. यामुळे नागरिकांसह जनावरांचे स्थलांतर सुरूच आहे. आज दिवसभरात सहा हजार २१० नागरिकांचे, १६७७ कुटुंबांचे व ३१११ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २१ हजार हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.
सध्या आलमट्टी धरणातून दोन लाख ९६ हजार ७९४ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेक, राधानगरी धरणातून ४ हजार ३५६ क्युसेक, वारणा धरणातून १६ हजार ९७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा व कृष्णेच्या पुरामुळे शेडशाळ येथील शेतकऱ्यांना जनावरांसाठीचा चारा नावेतून आणावा लागत आहे.
पातळीत अर्ध्या फुटाने घट

पावसाची उघडझाप; पूरस्थिती मात्र कायम

‘राधानगरी’च्या दोन दरवाजांतून विसर्ग सुरूच
पॉईंटर

  • सहा हजार नागरिक, १६७७ कुटुंबे, ३१११ जनावरांचे स्थलांतर
  • ८६ बंधारे पाण्याखाली
  • १०४ मार्ग बंद
  • भाजीपाल्यांच्या दरावर परिणाम
  • जिल्ह्यातील २१ हजार हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली
  • घरे, जनावरांच्या गोठ्यांचे एक कोटी ३४ लाखांचे नुकसान
  • शहरात पाणी ओसरलेल्या ठिकाणी औषध फवारणी
  • जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाचा जोर कमी होता.

त्यामुळे दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी अर्धा फुटाने उतरली. त्यातच सकाळी व सायंकाळी काही काळ सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. सध्या राधानगरी धरणातील फक्त दोन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू आहे. शहरात काही भागांतील पाणी हळू हळू ओसरू लागल्याने तेथे महापालिकेकडून स्वच्छता सुरू करण्यात आली.