पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत रविवारी भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे.भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.कांस्य पदक जिंकताच सोशल मीडियावर मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे.याचदरम्यान मनू भाकरच्या ग्लॅमरस लूकची भुरळ देखील नेटकऱ्यांना पडली आहे.
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे.मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत.नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.