या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा होणार आहेत.नमो शेतकरी योजना: नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.आता शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, राज्य सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देऊ शकते. हप्ता वितरणाचा संभाव्य कालावधी: मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.