जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.
मेष राशी
आजचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. पण आज तुम्हाला तुमची ऊर्जा आणि योजना योग्य दिशेने न्याव्या लागणार आहेत. संभ्रमित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचे विचार स्पष्ट ठेवा. तुम्हाला आज मोठा भाऊ आणि वडिलांकडून लाभ होईल. तुमचा बजेट संतुलित ठेवाल. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील. तुमची आर्थिक बाजूही संतुलित राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या गोष्टीवरून खटके उडतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
आज तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घ्याल. ज्यांना आज मालमत्तेत गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला आज व्यापारात लाभ मिळेल. पूर्वानुभव आणि अपार कष्टाचं फळ मिळेल. कोर्ट कचेरीचं एखादं प्रकरण सुरू असेल तर आज त्यातून मुक्ती मिळेल. आजची संध्याकाळ तुमच्यासाठी अत्यंत सुखद असेल. भावांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. रोजगाराशी संबंधित एखादी माहिती मिळेल.
मिथुन राशी
आज तुमचं मन कोणत्याच कामात लागणार नाही. तुमचं लक्ष एका ठिकाणी असेल आणि मन एका ठिकाणी. त्यामुळे अशावेळी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगा. भावांकडून आज तुम्हाला प्रचंड मदत मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ आणि यश न मिळाल्याने तुम्ही निराश व्हाल. सासूरवाडीकडून आज मोठं सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता जाणवेल. संध्याकाळी धार्मिक कार्यात भाग घ्याल.
कर्क राशी
आज तुम्हाला हात लावाल त्या कामात यश मिळेल. जो लोक आजारी आहेत, त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होणार आहे. तुमची मुलं आज चांगल्या कार्यात भाग घेतील. त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मनपसंत भोजनावर ताव माराल. प्रेमीयुगलांसाठी आज दिवस बेक्कार आहे. आज त्यांची चोरी पकडली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होतील. मात्र, संयम राखल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना आज व्यापारात प्रचंड नफा होईल. या राशीच्या लोकांना शेअर बाजारात अपेक्षित यश मिळेल. मात्र, कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कौटुंबिक जीवनात ताळमेळ निर्माण होईल. धर्मकार्यात भाग घ्याल. धार्मिक प्रवचनं ऐकण्यात रस निर्माण होईल. एखादी मोठी गोष्ट हातून घडेल. धार्मिक यात्रेवर जाण्याचा बेत आखाल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आज संध्याकाळपर्यंत गुड न्यूज मिळेल. आज तुम्हाला परदेशातून चांगली बातमी ऐकायला येईल.
कन्या राशी
नोकरीपेक्षा आणि व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. आज तुम्ही एखादा नवा बेत आखण्याची शक्यता आहे. जे लोक कला आणि रचनात्मक क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांनाचा आज त्या क्षेत्रात प्रभाव वाढेल. लोकलचा प्रवास नकोसा वाटेल. आज तुम्हाला प्रचंड आळस येईल. फॅमिली लाइफ अत्यंत चांगली असेल. एखाद्याच्या सल्ल्यानुसार वागण्याचा स्वभाव सोडा.
तुळ राशी
आजचा दिवस प्रगतीकारक ठरणारा आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. जी गोष्ट ऐकायला अनेक महिन्यांपासून अतूर होता, ती आज ऐकायला मिळेल. प्रेयसीचा रुसवा काढताना नाकीनऊ येईल. बोगस प्रियकरापासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी हितशत्रू डोकं वर काढतील. बॉसची मर्जी बसेल. आज नव्या सहकाऱ्याशी ओळख होईल.
वृश्चिक राशी
गावाकडे जाण्याचा योग आहे. वाहने जपून चालवा. आज चालून आलेल्या संधीचं सोनं करा. तुमचे वाईट कर्म तुम्हाला आज त्रास देतील. अनेक स्त्रोतून आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची लव्ह लाइफ अत्यंत चांगली राहील. कुटुंबात जीवनसाथीचं सहकार्य मिळेल. तुमच्या यशावर अहंकाराचं अतिक्रमण होऊ देऊ नका. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं टाळा.
धनु राशी
आज तुम्ही नकारात्मक विचार करणाऱ्यांपासून दूर राहा. एखादा मित्र तुमच्या व्यवसायात तुम्हाला आज मदत करेल. तुम्ही आज नवीन डील फायनल कराल. आर्थिक आघाडीवर आज तुमची स्थिती चांगली असेल. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. वाद विवादापासून दूर राहा. आज तुमची इच्छा पूर्ण होईल. परदेशातील प्रिय व्यक्तीशी संवाद साधण्याची शक्यता आहे. चांगलं पुस्तक हाती लागेल. सामाजिक कार्यात भाग न घेता आल्याने मनाला रुखरुख लागेल.
मकर राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज तुम्ही पार्टनरसोबत वेळ घालवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान लागू करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत एखाद्या अधिकाऱ्याच्या मदतीने एखादी मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. जीभेवर नियंत्रण ठेवा. उतावळेपणा करू नका. आज जास्तीत जास्त वेळ घरासाठी द्याल. जुने मित्र भेटायला यायची शक्यता आहे. ऑफिसमधील कामाचं टार्गेट पूर्ण कराल.
कुंभ राशी
नोकरीत आज तुमचा प्रभाव वाढेल. नव्या कामाची जबाबदारी मिळेल. तुमचे शत्रू तुमच्या वाढत्या प्रभावामुळे शांत राहतील. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला मोठी खुशखबरी मिळू शकते. वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील. जीवनसाथीकडून तुम्हाला आज एखादी भेट मिळण्याची शक्यता आहे. कल्पनेच्या जगात वावरू नका. वास्तव परिस्थितीचं भान ठेवा. नाही तर मोठं नुकसान होईल. आज खरेदीचा योग आहे. त्यामुळे खर्च अधिक वाढेल.
मीन राशी
बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही आज कार्यक्षेत्रात लौकीक मिळवाल. प्रत्येक समस्येवर मार्ग काढाल. कुटुंबात कलह सुरू असेल तर तुम्ही तुमच्या जीभेवर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, शब्दानेच शब्द वाढतो. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असेल. बदलीच्या ठिकाणी कामाला असणाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आज नव्या सहकाऱ्यासोबत काम करावे लागेल. व्यवसायात लाभ होईल. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.