मिरवणुकांमध्ये सर्व मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याच्या सूचना……

सोलापूर शहरात १ ते ४ ऑगस्टपर्यंत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. ४ ऑगस्टला निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये सर्व मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिल्या आहेत.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयात पोलिस अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, महापालिकेचे अधिकारी, जंयती उत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

पोलिस आयुक्त म्हणाले, उत्सव काळात मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मंडप मारताना रस्त्याचा दोन तृतीयांश भाग वाहतुकीसाठी मोकळा सोडावा, मोकाट जनावरांचा मूर्ती किंवा फोटोला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी, उत्सवाचे पावित्र्य राखावे, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारीसंदर्भात जनजागृती करावी, मूर्तीसमोर स्वयंसेवक ठेवावेत, सर्वांनी कायदेशीर बाबींचे पालन करावे.

याशिवाय सर्व मंडळांनी संबंधित पोलिस ठाण्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन परवानगी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहनसर्व मंडळांनी वाद्यांचा आवाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवावा मंडळांनी महावितरणकडून अधिकृतपणे वीजजोडणी कनेक्शन घ्यावेमिरवणुकीत मोठे व लांब कंटेनरचा वापर नको,

वाहनावरील देखाव्याची उंची अडथळा होणारी नसावीमिरवणुकांमधील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावीसोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ प्रसारित होत असल्यास पोलिसांनी त्याची माहिती द्यावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी.