भारतीय संघाने टी २० सामन्यात तिसरा सामना जिंकत मालिका एकतर्फी फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मालिकेतील तिसरा सामना हा बरोबरीत सुटला. पण, सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला.श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी ३ धावांचे आव्हान दिले होते.
हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.मालिकेतील तिस-या व शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. भारताने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. तर श्रीलंकेने २० ओव्हरमध्ये १३७ धावा केल्या.
त्यानंतर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात भारताला विजय मिळाला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला अवघ्या २ धावाच करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर याने सुपर ओव्हरमध्ये कुसल परेरा आणि पाथुम निसांका या दोघांना आऊट केले. त्यानंतर भारताला फक्त ३ धावांचे आव्हान मिळालं. हे आव्हान कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केले.
भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १३७ धावा केल्या. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांव्यतिरिक्तत एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. शुबमन गिल याने ३९, यशस्वी जयस्वाल याने १०, शिवम दुबने १३, रियान पराग याने २६ तर वॉशिंग्टन सुंदर याने २५ धावा केल्या.