सांगोला तालुक्यात 3ऑगस्टला जन्मलेल्या मुलींच्या नावे 15 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा संकल्प!

माजी नगरसेवक तथा गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी आपल्या 3 ऑगस्ट रोजी वाढदिवसादिवशी सांगोला शहर व तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी15 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा संकल्प केला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलगा व मुलगी एक समान मानावे.मुलीच्या जन्माचे कुटुंबामध्ये व समाजामध्ये स्वागत व्हावे या उदात्त हेतूने वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा केलेला संकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे.

सन 2016 ते 2023 या कालावधीमध्ये 3 ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या 31मुलींच्या नावे एकूण 3 लाख 48 हजार रुपये ठेव ठेवून सामाजिक उपक्रम व संकल्प पूर्ण केला आहे. तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे व निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वाढदिवसादिवशी मान्यवरांच्या हस्ते सांगोला शहरातील प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अशी माहिती आनंदाभाऊ माने यांनी दिली आहे.

3 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला शहर व तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे. तालुक्यात 3 ऑगस्ट 2024 रोजी ज्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला आहे त्यांनी डॉक्टरांचा जन्माचा दाखला व मुलीचा जन्म घरी झाला असल्यास तशा प्रकारचा पुरावा माहितीसाठी द्यावा.

मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी राशन कार्ड, मुलीच्या आईचे व वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स व आईचे आयडेंटी साईज 2 फोटो 5 ऑगस्ट पर्यंत राजमाता प्रतिष्ठान कार्यालय , ग्रामीण रुग्णालयाशेजारी सांगोला येथे जमा करावे असे आवाहन माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांच्याकडून करण्यात येत आहेआहे. मुलीच्या नावे ठेवण्यात आलेली सदरची ठेव मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांना दिली जाणार आहे.