भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांसह, उपस्थित महिलांना भेटवस्तू

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मागील वर्षा पासून कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा ” आयोजित केल्या जातात.चालू वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सांगोला शहर व तालुक्यातून शेकडो महिलांना गौरी गणपतीच्या निमित्ताने बेटी बचाव ,बेटी पाढाव,पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ भारत सुंदर भारत यासह अनेक सामाजिक थीम घेवून सहभाग नोंदविला होता. कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार दी.२८ सप्टेंबर रोजी हर्षदा लॉनस् येथे पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. जि. प. अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड, सौ शिलाकाकी झपके,सौ.मधुमती साळुंखे ,सौ. रूपमती साळुंखे,सौ.जयश्री भाकरे,सौ.राजलक्ष्मी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विजेत्यांना पैठणी, कुकर, मिक्सर, हॉट-पॉट, पितळी भांडे व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तर स्पर्धेत सहभाग नोडविलेल्या सर्व महिलांना पितळी भांडे देवून सन्मानित करण्यात आले.