शिंदेंनी लोकसभेत पक्षाची जबाबदारी सोपवली युवा खासदार धैर्यशील मानेंवर…..

धैर्यशील माने हे हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नुकताच धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दांत समाचार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आले असून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना अस्मान दाखविले होते. माने यांनी सलग दुसर्‍यांदा आपली जागा कायम राखताना सरूडकर यांचा १३ हजार ४२६ मतांनी पराभव केला होता.धैर्यशील माने यांच्या विजयात इचलकरंजीकरांचा मोठा वाटा आहे.

शिवसेना शिंदे गटाने लोकसभेत पक्षाची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. लोकसभेतील शिवसेना शिंदे गट संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे.