कोल्हापूर दक्षिण ‘जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट

आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून मिशन रोजगार अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, आयुष्यात संधी खूप असतात मात्र तिथपर्यंत पोहोचणे खूप महत्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने किमान एक तरी कौशल्य आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञान व विविध प्सचा वापर करून विद्याथ्र्यांनी तंत्रज्ञान पूरक व्हावे, नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळवून आत्मविश्वास वाढवावा.

मुलाखत दिल्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करा, आपण कुठे कमी पडलो हे तपासा आणि त्या चुका पुढच्या वेळी दुरुस्त करा. या जॉब फेअर मध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळतीलच. मात्र ज्यांना संधी मिळणार नाही त्यांच्यासाठी पुढच्या वेळेसाठीचा चांगला अनुभव व आत्मविश्वास या ठिकाणी निश्चितच मिळेल. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांना यापुढेही मिशन रोजगार’ च्या माध्यमातून जॉब अलर्ट व माहिती पोचवली जाईल, त्याचबरोबर आत्मविश्वासाने मुलाखतीसाठी सामोरे जाता यावे यासाठी कायमस्वरूपी फिनिशिंग स्कूल सुरू करणार असल्याचे यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, युवा पिढीला नोकरीच्या संधी चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जॉब फेअर’ उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सहभागी संस्थाचे आभार मानून नोकरी इच्छुकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. स्नॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यानी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व उद्योग संघटनांच्यावतीने अभिनंदन करतो. पुढील १० वर्षे मोठ्या संधीची आहेत. अपयशाने नाराज होऊ नका, ही सुरुवात असून नव्या संधीना सामोरे जावे.

सहभागी कंपन्याच्यावतीने सिटेल ग्लोबलचे सीएचआरओ सुधीर मतेती म्हणाले, युवक- अशा मोठ्या अपेक्षा न ठेवता प्रथम कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करावा. सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप येईल. चांगले काम करून आपली ओळख बनवा. डॉ अमित अद्रि म्हणाले,या जॉब फेअरच्या माध्यमातून नक्कीच आपले लाइफ बदलेल. आपली कौशल्ये ठामपणे कंपनी प्रतिनिधीसमोर मांडा. प्रामणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. प्राचार्य डॉ महादेव नरके यानी सूत्रसंचालन केले. यावेळी गोशिमाचे दिपक चोरणे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे दिनेश बुधले, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, क्रीडाईच गौतम परमार, मिरजकर, आदित्य बेडेकर, आयटी असोसिएशनचे प्रताप पाटील, मॅकचे हरिचंद्र धोत्रे, उद्योजक तेज घाटगे, नितीन दलवाई, माजी नगरसेवक शासगधर देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.