सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील लाखो रुपये वसूल…

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला होता. निलंबित कर्मचारी योगेश वजरीनकर यांनी ४० लाख रुपये बँकेत जमा केले आहेत.अपहारातील १०० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत.

जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला. त्यांचा सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदतीत २१ लाख रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी जबाबदार धरून प्रमोद कुंभार, तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले आणि लिपिक योगेश वजरीनकर यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली.या कारवाईनंतर जिल्हा बँक प्रशासनाने केवळ दोनच दिवसात ४० लाख रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांची तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे