इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा कॉलेज विद्यार्थ्यांवर हल्ला!

सध्या पावसाची रिपरिप चालूच आहे. अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेलीच आहे. त्याचप्रमाणे अनेक गावोगावी रस्त्यामध्ये खड्डे देखील पडल्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच इचलकरंजी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढलेली आपणाला पाहायला मिळत आहे.

या भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतलेला आहे. अशातच आज म्हणजेच शुक्रवारी इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर अचानक हल्ला चढवला. कुत्री अंगावर येताच विद्यार्थ्यांनी दहा फुटांवरून उडी मारली. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. इचलकरंजी शहरातील अग्रेसर भवन परिसरात ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे.