या तालुक्यातील आठ हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान….

सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये सतत पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या शेतीला फटका बसला आहे.

यामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यांतील ११६ गावांतील अंदाजे ८ हजार ५५६ हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळ असे पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.तसेच इतर तालुक्यांत संततधार पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले.

अतिवृष्टी आणि पुराचा फटका मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यांतील वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या ११६ गावांना बसला. या पावसामुळे सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, हळद आणि पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पूर आणि अतिवृष्टीमुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील अंदाजे ११७ गावांतील २२ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या ८५५६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.