वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील दारूबंदीसाठी रविवारी दि. २८ जुलैला मतदान होणार आहे, तरी सर्व महिला ग्रामस्थांनी मतदानास उपस्थित राहून उभी बाटली आडवी करावी, असे आवाहन सरपंच सुभाष कुंभार व उपसरपंच संदीप गायकवाड यांनी केले. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावामध्ये उभी बाटली आडवी करण्याच्या निर्णयाची परिसरातील सर्व गावांना उत्सुकता लागली आहे. दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे.