इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याप्रश्नी निशिकांत भोसले – पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. इस्लामपूर गेल्या ५० वर्षांपासून इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या पाणंद रस्त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात १८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
आता दुसऱ्या टप्प्यात या रस्त्यांसाठी ७ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आजपर्यंत १४५ कि. मी. च्या पाणंद रस्त्यांसाठी एकूण २६ कोटी १० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.