महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच मतदार संघाची तयारी सध्या मनसे कडून केली जाते. याच दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीचं रणशिंग ते मराठवाड्यातून फुंकणार आहेत. शिवाय, यामध्ये सोलापूरच्या दौऱ्याचाही समावेश असणार आहे.
विधानसभेच्या रणनीतीसाठी आजपासून राज ठाकरेंचा दौरा….
