खासदार धैर्यशील माने यांची पूरग्रस्त दानवाढला भेट….

नवे व जुने दानवाड येथील दूधगंगा-कृष्णा नदीस आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्‍यक्षात भेट दिली.यावेळी ग्रामस्थांची पूर परिस्थितीबाबत विचारपूस केली. तसेच शासन सर्वतोपरी पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत असल्याचे सांगून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी बोलताना खासदार माने म्हणाले की, दानवाड गाव हे कोल्हापूर जिल्हाच्या शेवटचा गाव असून, प्रामुख्याने कृष्णा नदी ही सर्व उपनद्यांना घेऊन अखेर दुधगंगा नदीस सामावून घेऊन कर्नाटक मध्ये अखेरचा प्रवेश करते. त्यामुळे येथील पाणी निचरा प्रामुख्याने इतर गावांच्या तुलनेने लवकर होत नाही. तसेच उन्हाळ्यात दूधगंगा नदी ही कोरडी पडते.

या सगळ्याचा विचार करता केंद्र व राज्य शासनस्तरावर या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन केले.या प्रसंगी ॲड. राहुलराज कांबळे, नवे दानवाड गावाचे लो.सरपंच सी.डी.पाटील, जुने दानवाड गावच्या सरपंच राजश्री तासगावे, रामराज पाटील, कृषी सहायक भमाने, डॉ.अनिसा नदाफ, आरोग्य सेवक दिलीप अटपाळे , नवे-जुने दानवाड गावातील ग्रामपंचायत सदस्य – सदस्या, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह दोंन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.