इचलकरंजी येथे बांधकाम कामगारांच्या मागण्या संदर्भात कामगार संघटनांचे आम. राहुल आवाडे यांना निवेदन 

इचलकरंजी येथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यासाठी स्वतंत्र सहायक कामगार आयुक्त कार्यालय आहे. ऑनलाइन पोर्टलवर इचलकरंजी हा स्वतंत्र विभाग म्हणून दाखवला जातो. मग कोल्हापूरमध्ये संच का असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तू भांडी व अत्यावश्यक संच हे या तीन विभागातील इचलकरंजी येथेच वाटप करावे या मागणीचे निवेदन कामगार संघटनांच्यावतीने आम. राहुल आवाडे यांना देण्यात आले.

याप्रकरणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अत्यावश्यक सेवा संच व गृहउपयोगी वस्तू हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ या तालुक्यातील इचलकरंजी येथे वाटप करावे असे ठेकेदार व सहाय्यक कामगार आयुक्त यांना आम. राहुल आवाडे यांनी सुचना दिल्या. यावेळी आवाडे यांनी संबंधित ठेकेदार व सहायक कामगार आयुक्त यांना याच विभागामध्ये सदरचे वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या.  शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, आनंदा गुरव, मदन मुरगुडे आकाश बनसोडे, महेश लोहार, राजेंद्र निकम, आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.