सांगोला विद्यामंदिरच्या प्रतीक्षा येलपलेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

दिनांक २९ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर (विसापूर) जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील कुमारी प्रतीक्षा दत्तात्रय येलपले ११ वी शाख व हिने १९ वर्षे मुली वयोगटामध्ये गोळाफेक स्पर्धेमध्ये ११:५७ मिटर गोळाफेक करून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला व ती पुढील चंद्रपुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तसेच कुमारी दिपाली बसवंत दोलतोडे हिने विभागस्तरावर भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत २४.२९ मीटर भालाफेक करून सहावा क्रमांक मिळविला. यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.डी. के पाटील, नरेंद्र होनराव, सुनिल भोरे, सुभाष निंबाळकर, प्रा. संतोष लवटे, प्रा. सचिन चव्हाण, अन्सार इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, विभीषण माने व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या यशाबद्दल खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव शुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी विश्वराजी झपके, सर्व अध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.