१९ फेब्रुवारीला शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा द्यावी अशी मागणी स्व. शरद लाहिगडे फौंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहिगडे यांनी दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
कासेगावमध्ये उद्यान व छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यासाठी कासेगाव ग्रामपंचायतीने गट नंबर १२७३ मधील कासेगाव बाजारपेठेचा दक्षिण पूर्व कोपरा आरक्षित करून द्यावा अशी मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यास पुतळा समिती स्थापन करून ४१ लाख रुपये खर्चून फौंडेशन व लोकवर्गणीतून पुतळा उभारण्याचा मानस अतुल लाहिगडे यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच कल्पना गावडे, उपसरपंच सुजीत पाटील, दादासो पाटील, संतोष पाटील, सचिन पाटील, दत्तात्रय मरडे, सुरेश माने, कल्पना देशमुख, राणी माने, संगीता जाधव, बंडासो देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.