इस्लामपूर कॅम्पस क्लब आणि कुलकर्णी वॉच कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध जादूगार अमित सोलंकी यांचा मॅजीक शो (जादूचा प्रयोग) खास बालचमूंसाठी शनिवार, दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सिद्धनाथ मंगल कार्यालय मंत्री कॉलनी इस्लामपूर येथे आयोजित केला आहे. जादूनगरीत मुलांच्या मेंदूंना चालना आणि आश्चर्यजनक प्रयोगाचा खजिना मिळणार आहे. तरी कॅम्पस क्लबच्या सभासदांनी या जादूनगरीत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जादूच्या प्रयोगामुळे मुलांना केवळ मनोरंजन होणार नसून त्याबरोबर त्यांना नवनवीन जादूचे प्रयोग तसेच कला अनुभवयास मिळणार आहे. टिव्ही चॅनेलमधून पाहयला मिळणारी जादू प्रत्यक्ष अनुभवायस मिळणार आहे.