इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघाच्या शिबिरात १७८ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

राजारामबापू दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कराड व दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर झाले. यावेळी १७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. प्रतिमापूजन अध्यक्ष नेताजीराव पाटील यांच्याहस्ते झाले. शिबिरात दंत, त्वचा, स्त्रीरोग, नेत्ररोग मधुमेह रक्तदाब व कर्करोग, मेंदू आजार, नाक, कान, घसा यासारख्या १४ आजारांवर तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. संचालक पोपटराव जगताप यांनी आभार मानले. उपाध्यक्ष शशिकांत पाटील, संचालक दिलीप खांबे, प्रशांत थोरात, विकास कांबळे, अल्लाउद्दीन चौगुले, संजय शिंदे व जगन्नाथ पाटील तसेच संघाचे कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. ढोपे, जनरल मॅनेजर पी. आर. पाटील, बी. ए. कोरे, कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे, अधिकराव मोहिते उपस्थित होते. पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.