भर बाजारपेठेत विट्यातील तरुणाचा भोकसून खून….

विट्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विट्यात भर बाजारपेठेत तरुणाचा भोकसून खून करण्यात आलेला आहे यामुळे विटा परिसर हा हादरून गेलेला आहे. मायणी रस्त्यावर विट्यातील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याने विटा परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. विट्यातील पृथ्वीराज वाईन शॉप समोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला धारदार शस्त्रांनी भोकसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विट्यातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदिवे हा तरुण आणि तात्यासाहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून वादावादी सुरू झाली या वादातून तात्या पवार यांनी आपल्याजवळ असणारा शस्त्राने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदिवे याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदिवे जखमी झाला.

यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमीला चिक्या उर्फ प्रीतम विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी तात्या पवार याला ताब्यात घेऊन या हल्ल्यात आणखी कोणी हल्लेखोर सामील आहेत का याचा तपास सुरू केला आहे. तर हा खूनाचा प्रकार दारूच्या नशेत घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.