‘हर घर तिरंगा’ प्रभावीपणे राबवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना…..

जिल्हा विभागप्रमुखांची बैठक यंदाही हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. याबाबत त्यांनी आज तालुका तसेच जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रानेही अभियानात लक्षवेधी कामगिरी केली आहे. याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (ता. ९) ते गुरुवार (ता. १५) या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवायचे आहे. त्यानुसार ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम आयोजित करा.

हर घर तिरंगा कार्यक्रम उपक्रमादरम्यान तिरंगा यात्रा, रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट व तिरंगा मेळावे होतील. घरोघरी तिरंगा सन्मानाने सर्वांनी लावावा यासाठी विशेष जनजागृती करण्यात येईल.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तिरंगा उपलब्ध असल्याची माहिती तहसीलदार तथा करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली. याबाबत अडचणी येत असतील तर तातडीने तिरंगा उपलब्ध करून देण्यासाठी कळवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या