सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य! हातकणंगलेत गुन्हा……

बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीतून माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानास अनुसरून हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील व सध्या मुंबईस्थित अशोक बाबासो माने (वय ४५) याने सोशल मीडियावर विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील, अशी टिप्पणी त्याने स्वत:च्या सोशल मीडियावरील खात्यावरून केली आहे.

हे लोकांच्या लक्षात येताच संतापाची लाट पसरली आहे. मानेच्या सोशल मीडियावरील त्या टिपण्णीने संबंधित समाजबांधवाच्या भावना दुखावल्या असुन बुधवारी रात्री उशिरा माने याच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात प्रतीक सुविचार भोकरे (रा. रुकडी) याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधितावर कडक कारवाईची मागणी केली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.