पेठवडगावात सुरू होणार सबरजिस्टर कार्यालय !लवकरच होणार वडगाव तालुका…….

पेठवडगाव येथे लवकरच सबरजिस्टर कार्यालय सुरू होणार आहे तर वडगाव विभागातील गावांसाठी हातकणंगले येथे अप्पर तहसीलदार यांची नेमणूक झाली आहे. हे नियोजित वडगाव तालुका कृती समितीला पहिल्या टप्प्यातील यश मिळाले, अशी माहिती नियोजित वडगाव तालुका कृती समितीचे अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली.
बैठकीला माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, प्रभाकर साळुंखे (पारगाव), राजेंद्र पाटील (अंबप ), प्रविण यादव (मिणचे), माजी उपनगराध्यक्ष सुनील हुक्केरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन २००३ पासून वडगाव तालुका निर्मितीचा पाठपुरावा सुरू आहे. वडगाव तालुका निर्मितीसाठी गेल्या दोन वर्षांत पुणे, मुंबई मंत्रालयात प्रस्ताव दिला आहे. याचा पाठपुरावा करताना पहिल्या टप्प्यात सबरजिस्टर कार्यालय मंजूर झाले व अप्पर तहसिलदार यांची हातकणंगले येथे नेमणूक झाली. यामुळे गेले वर्षभरात अनेक नागरिकांना त्याचा लाभ झाला. हे नियोजित वडगाव तालुका कृती समितीचे पहिले यश आहे. पुढील टप्प्यात लवकरच वडगाव तालुका होणार असे वडगाव तालुका कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी सांगितले.